

dhananjay munde amit shah
esakal
Manikrao Kokate: सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामुळे मंत्रिपद गमावलेले धनंजय मुंडे यांनी दिल्लीवारी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीचं कारण त्यांनी भलतंच सांगितलं असलं तरी राजकीय जाणकारांच्या मते ही भेट मंत्रिपदासाठी होती. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जातंय, असं बघता ते खातं आपल्याला मिळावं, अशी अपेक्षा धनंजय मुंडे बाळगून आहेत, असं बोललं जातंय. इतर पक्षांच्या राजकीय नेत्यांनी याच अनुषंगाने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.