Yashashri Shinde Murder Case: दाऊदने यशश्रीची हत्या का केली? जबाबात धक्कादायक माहिती आली समोर

Uran Yashashri Shinde: ''ती येत नव्हती म्हणून मी धारदार शस्त्राने तिची हत्या केली आणि बस पकडून गावी गेलो.'' असं दाऊद म्हणाला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आहेत. ज्या शस्त्राने दाऊदने यशश्रीचा खून केला त्या शस्त्राचा शोध पोलिस घेत आहेत.
Yashashri Shinde Murder Case
Yashashri Shinde Murder Caseesakal
Updated on

Uran Crime News: यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची अमानूष पद्धतीने हत्या करणारा आरोपी दाऊदला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतला. या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाऊदचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यशश्रीने आपल्यासोबत लग्न करण्यास नकार देऊन सोबत कर्नाटकला आली नाही. त्यामुळे आपण तिचा खून केल्याची कबुली दाऊदने दिली आहे. यशश्रीची हत्या कशी केली, याबाबत दाऊदने पोलिसांना माहिती दिली.

Yashashri Shinde Murder Case
Taloja Dumping Ground: मुंबईचा कचरा तळोज्यात! अत्याधुनिक डम्पिंग ग्राऊंडसाठी महापालिकेकडून वेग; तीस हेक्टर जागा अन्..

दाऊदने पोलिसांना सांगितलेला दोघांमधला संवाद

दाऊद - लग्न करून कर्नाटकला चल

यशश्री - नाही

दाऊद - भेटण्यासाठी उरणला ये

यशश्री - नाही

दाऊद - माझ्याकडे असलेले तुझे फोटो फेसबुकवर अपलोड करीन

यशश्री - प्लीज तसं करु नको

दाऊद - मग भेटायला ये

यशश्री - येते. पण फोटो डिलीट कर

दाऊद - फोटो डिलीट केले आता लग्न करून कर्नाटकला चल

यशश्री - मी कर्नाटकला येणार नाही

त्यानंतर दाऊद पोलिसांना म्हणाला, ती येत नव्हती म्हणून मी धारदार शस्त्राने तिची हत्या केली आणि बस पकडून गावी गेलो. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आहेत. ज्या शस्त्राने दाऊदने यशश्रीचा खून केला त्या शस्त्राचा शोध पोलिस घेत आहेत.

नेमकी घटना काय?

उरणमधील २२ वर्षीय यशश्री शिंदे काही दिवसांपासून बेपत्ता होती. पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता. तेव्हा पोलिसांना यशश्रीचा मृतदेह आढळून आला.तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. तिच्या चेहऱ्यावर, पाठीवर वार करण्यात आले होते. तसेच, स्तन आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळून आल्या होता. यशश्रीचा मृतदेह पाहून पोलीस देखील हादरून गेले होते.

यशश्री शिंदे ही २५ जुलैपासून बेपत्ता होती. २७ जुलैला तिचा मृतदेह रेल्वेस्टेशन जवळच्या झाडीमध्ये आढळून आला होता. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, यशश्री ही बेलापूरमधील एका कंपनीमध्ये कामाला होती. ती कामाला गेली होती अन् परत आलीच नाही. तिचा फोन देखील बंद होता. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com