Jayant Patilesakal
महाराष्ट्र बातम्या
Jayant Patil: जयंत पाटलांचा भाजप प्रवेश का रखडला? वाचा पडद्यामागच्या राजकीय घडामोडी...
जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला खूप फायदा होईल अशी परिस्थिती नाही. पण, राजकीय दृष्ट्या भाजपची रणनीती ठरली तर, पवारांना शह देण्यासाठी अन् तुमच्या नाकाखालून तुमचा प्रदेशाध्यक्ष पळवला असा संदेश देण्यासाठी भाजप याचा राजकीय फायदा करून घेऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात जाणार अशा चर्चा कालही होत्या, आजही आहेत अन् उद्याही राहतील. त्याचं कारण असं की जयंत पाटील हे राजकारणी आहेत. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अन् महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी असल्यानं काही ना काही कारणास्तव ते सत्ताधारी मंत्रिमंडळातील लोकांच्या भेटीगाठी घेणार. पण आता पुन्हा जयंत पाटलांचा विषय चर्चेत आला, पहिलं कारण म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची त्यांनी नुकतीच घेतलेली भेट आणि दुसरं म्हणजे मागील आठवड्यात सांगलीतील त्यांच्या शैक्षणिक संस्थेत झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची हजेरी. त्यामुळे आता जयंत पाटलांचा पक्षप्रवेश का, कुणामुळे रखडला? असा प्रश्न उपस्थित होतोय.

.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)