"विष पाजलं, उशी दाबली", कॉल रेकॉर्डींगने फुटलं पतीच्या हत्येचं बिंग; लेकीमुळं पत्नी अटेकत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

"विष पाजलं, उशी दाबली", कॉल रेकॉर्डींगने फुटलं पतीच्या हत्येचं बिंग; लेकीमुळं पत्नी अटेकत

चंद्रपूर - मागील चार ते पाच दिवसांपासून देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून खळबळ उडवून देणारी घटना समोरी आली असून एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. महिलेच्या लेकीनेच आपल्या आईचं खरं रूप समोर आणलं. या प्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. (Crime news in Marathi)

हेही वाचा: Earthquake: हिमाचल प्रदेशात ४.१ तीव्रतेचा भूकंप

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर शहरातील आंबेडकर चौकात आरोपी रंजना रामटेके हिचं दुकान आहे. तर मुकेश त्रिवेदी याचं तिथेच बांगड्यांचं दुकान आहे. आरोपी रंजना हिने ६ ऑगस्ट २०२२ रोजी नागपूरला असलेल्या मुलींना तुमच्या वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. मृत श्याम रामटेके हे निवृत्त वनकर्मचारी होते.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या स्वभावात बदल झाला होता. शिवाय आरोपी मुकेश त्रिवेदीचं घरी येणंजाणं वाढलं होतं. यामुळे समाजात बदनामी होतेय म्हणून मुलींनी आईला आणि त्रिवेदीला समज दिली. तसेच आई एकटी राहात असल्याने छोटी मुलगी परत घरी राहयला आली.

दरम्यान वडिलांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी मुलीने आपल्या आईला एक मोबाईल घेऊन दिला होता. तो मोबाईल छोट्या मुलीने तपासला. तेव्हा तिला त्यात फोन रेकॉर्डींग आढळून आले. त्यातून तिच्यासमोर धक्कादायक सत्य समोर आलं.

हेही वाचा: तुम्हाला बाळासाहेबांशी नात सांगण्याचा अधिकार नाही; फडणवीस आदित्य ठाकरेंवर कडाडले

रेकॉर्डींगनुसार ६ ऑगस्ट रोजी २०२२ पहाटे २.१४ मिनिटांनी आरोपी रंजना १० मिनिटे मुकेश त्रिवेदीसोबत बोलत होती. त्यानंतर मुलीने रेकॉर्डींग आपल्या मोबाईलवर शेअर केली. त्यात वडिलांचे हात बांधून विष पाजून आणि उशीने तोंड दाबल्याचा उल्लेख होता. त्यावर घरातील सर्व साहित्य निट करून सकाळी हृदयविकाराने पतीचा मृत्यू झाल्याचं सांग, असं त्रिवेदी बोलताना आढळून आला.

दरम्यान संपूर्ण रेकॉर्डींग ऐकल्यानंतर मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला याबाबत संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मोठ्या बहिणीने याबाबत पोलिसांनी कळवलं. पोलिसांनी आरोपी रंजना आणि आरोपी त्रिवेदीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.