Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रातच थांबवणार का? 'या' नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Maharashtra

Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रातच थांबवणार का? 'या' नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : सध्या महाराष्ट्रात असलेल्या 'भारत जोडो यात्रे'त सावरकरांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. एका कार्यक्रमात बोलताना खासदार राहुल शेवाळे यांनी 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रातच थांबवा अशी मागणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. (Will Bharat Jodo Yatra stop in Maharashtra Rahul Shevale complaint to CM Eknath Shinde)

हेही वाचा: Shraddha Murder Case: श्रद्धाच्या शरीराची विटंबना करणाऱ्या अफताबला फाशी द्या; चाकणकरांची मागणी

शेवाळे म्हणाले, "राहुल गांधींनी सावरकरांविरोधात विधान केल्यानं मी आज या व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की, या विधानाची गंभीर दखल घेऊन 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात थांबवावी. राज्यात कायद्याचं राज्य आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं राज्य आहे, हे दाखवून द्यावं"

हेही वाचा: Eknath Shinde: शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? 'ही' नावं आहेत चर्चेत

"तसेच सर्व शिवसैनिकांनाही मी आवाहन करतो की, जसं बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात 'जोडे मारो' आंदोलन केलं होतं. त्याप्रमाणं त्यांनीही राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन करावं" असं आवाहनही त्यांनी केलं.

भारत जोडो यात्रा थांबवणं अशक्य - काँग्रेस

दरम्यान, राहुल गांधी एक अशी व्यक्ती आहेत ज्याच्या कुटुंबानं आणि त्यांनी स्वतः या देशाला सर्वस्व या देशाला अर्पण करतो आहे. ही व्यक्ती देशावर खूपच प्रेम करतो, त्याला थांबवण्याचा अधिकार कोणालाच नाही. संविधानानं दिलेला हा अधिकार आहे, हे अन्यायकारी सरकार आहे. चांगल्याच्या समर्थनात ही यात्रा आहे. इतिहासाची मोडतोड करणं, गद्दारांसारखं वागणाऱ्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी हे अतिशय निरागसपणे लोकांचं ऐकून घेत आहेत. त्यामुळं त्यांना कोण थांबवणारं, शेवटी ही यात्रा जम्मूमध्ये जाऊनच थांबेल, असंही यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या.