
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अमरावतीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलन केलं. सातव्या दिवशी त्यांनी अन्नत्याग आंदोलन थांबवलं. दरम्यान, जळगावमध्ये भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार यांच्या घरी एका शेतकऱ्यानं पेट्रोलचं कॅन घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री पोहोचलेल्या शेतकऱ्याने हल्ल्याचा प्रयत्न केला पण प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला.