
मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भावांचं मनोमिलन झालं आणि आता उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची युती होणार हे निश्चित झालं आहे. दोन्ही भावांकडून तसे संदेश मिळाले आहेत. फक्त शिक्कामोर्तब तेवढा बाकी राहिला आहे. दिवाळीच्या नंतर महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत तरी ठाकरे बंधूंची ही युती कमाल करु शकते असं जाणकारांचे म्हणणं आहे. पण ठाकरे भावांच्या या युतीत इंडिया आघाडीचं काय? जे राज ठाकरे बऱ्याचदा मोदींची बाजू घेताना पहायला मिळाले, त्यांना काँग्रेस स्वीकारणार का? की भावासाठी ठाकरे 'इंडीया'तून बाहेर पडणार? याची चर्चा सध्या सुरु आहे. एकंदरीत यामागचं'राज'कारण नेमकं काय?