
मुंबई : बीडमध्ये सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य करताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. याविरोधात पत्रकार परिषद घेत प्राजक्तानं आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच धस यांच्या वक्तव्याचा विरोध करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावर धस यांना पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर आपण माफी मागणार नाही, अशा शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.