
मिरज, (जि. सांगली) - ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन राज्य शासनाने न पाळल्याने फसवणूक झाली आहे. शासनाकडून आदेश होईल म्हणून आजवर शांत होतो; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईत २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात आरपारची निर्णायक लढाई होईल आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षणाचा आदेश घेऊनच मुंबई सोडू, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.