Eknath Shinde : शिंदेंच्या खेडच्या सभेला राज ठाकरे जाणार? केसरकरांच्या विधानाने चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray eknath shinde

Eknath Shinde : शिंदेंच्या खेडच्या सभेला राज ठाकरे जाणार? केसरकरांच्या विधानाने चर्चा

मुंबईः उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेऊन एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील खेड येथे उत्तरसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला तुफान गर्दी झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यालाही रामदास कदम यांनी जशास तसं उत्तर दिलं होतं. परंतु आता मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान करुन नवीन चर्चांना पेव फोडलं आहे. त्यांच्या विधानावरुन शिंदेंच्या खेड येथील सभेला राज ठाकरे जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

हेही वाचाः परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सभेतल्या गर्दीबद्दल बोललं जातंय. परंतु राज ठाकरे आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल. केसरकर यांच्या या विधानाने चर्चा रंगू लागल्या आहेत.

केसरकर पुढे म्हणाले की, कोकणातील गर्दी ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी जमते. तुम्ही स्वतः कोकणात जावूनदेखील नारायण राणे यांचा पराभव करु शकला नव्हतात. असं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे हे सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

एकनाथ शिंदे १३ मार्चला खेड येथे सभा घेणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत म्हणाले, "शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १९ मार्चला खेडमध्ये (रत्नागिरी) शिवसेनेची जाहीर सभा घेणार आहेत. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर दिल्या जाईल. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार होणार आहेत." असं सामंत म्हणाले.