मुंबई - ‘स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण आहे. स्वातंत्र्यदिन व भाजपचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, त्यांना मदत करत होते. भाजपच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत,’ असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीसह राज्यातील काही महापालिकांनी १५ ऑगस्टला मांसाहार विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.