
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. जर अटी-शर्ती मान्य झाल्या तर हे दोघे एकत्र येतील, अशी दाट शक्यता आहे. यापूर्वी जे काही झाले, ते विसरून भविष्यात गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याविषयी शिवसेना आणि ‘मनसे’त विचार चालू आहे.