उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला | Winter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter
उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला | Winter

उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला

पुणे : राज्यात अवकाळी पाऊस (Heavy Rain) आणि गारपिटीने हजेरी लावली असतानाच, अचानक थंडी वाढल्याने उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला आहे. सोमवारी (ता. १०) निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.१ तापमान (Temperature) नोंदले गेले. आज (ता.११) उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. (Winter North maharashtra)

 खानदेशात रविवारी रात्री पारा घसरून सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. सातपुडा पर्वतातील दाब (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) येथे किमान तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले. धुळ्यातही तापमान सात अंश सेल्सिअस एवढे होते. जळगावातील रावेर, चोपडा, धरणगाव, अमळनेर भागात किमान तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.

हेही वाचा: लॉकडाऊनमधील नुकसान भरपाई; खाजगी बस ठेकेदारांना PMP कडून ९९ कोटी

पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर परिसरावर पश्चिमी चक्रावात सक्रिय असून, उत्तर हरियानामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पंजाब, हरियाना, चंडीगड राजस्थानमध्ये थंडीची लाट आली आहे. राजस्थानमधील सिकार आणि भिलवाडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या किमान तापमानात घट झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने किमान तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारच्या (ता.९) तुलनेत सोमवारी (ता. १०) किमान तापमानात ३ ते ६ अंशांची घट झाल्याने अचानक गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा जानेवारीतच तापमान नीचांकी

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात यंदा जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच पारा घसरला आहे. गतवर्षी याच वेळी तापमान १८ अंशांच्या आसपास होते. तर जानेवारी महिन्याच्या अखेरीस पारा ८.५ अंशांपर्यंत खाली आला होता. तर ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी पारा हंगामातील नीचांकी ६ अंशांवर आला होता. यंदा १० जानेवारी रोजी ६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे केंद्राकडील नोंदीवरून स्पष्ट होते,अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra NewsWinter
loading image
go to top