
Ajit Pawar : 'गिरीश महाजनांचे कॉन्टॅक्ट चांगले, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी' पवारांनी काढले चिमटे
नागपूरः राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सगळ्यांनाचाच त्यांनी समाचार घेतला. ते बोलत असतांना सभागृहात सदस्य पोट धरुन हसत होते.
तर मुद्दा होता मुख्यमंत्रीपदाचा. राज्यातील सर्व विभागांना मुख्यमंत्रीपद मिळालं परंतु उत्तर महाराष्ट्राला मिळालं नाही, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी खालून कुणीतरी गिरीश महाजन यांचं नाव घेतलं. त्यावर अजित पवारांनी महाजानांना चांगलेच चिमटे काढले.
हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला
अजित पवार म्हणाले, गिरीश महाजानांना मुख्यमंत्रीपद नव्हे तर मोठी जबाबदारी देण्याचं ठललंय. त्यांना युनायटेड नेशनची जबाबदारी देऊ, आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढीसाठीची जबाबदारी त्यांनी मिळणार असल्याचा चिमटा त्यांनी काढला. यानंतर सभागृहात हशा पिकला.
हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
अजित पवार पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करु, असं भाजपचे नेते म्हणाले होते. परंतु आमचं तिथं काम आहे. मी ठरवलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करु शकतो. मी कसा आहे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. देवेंद्रजीं म्हणतात, तसं मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, असंही अजित पवार बोलतांना म्हणाले.