Winter Session 2024 : सत्ताधारी अन् विरोधक दोन्ही बाजूंनी गोंधळ; शेवटी मार्शल बोलावण्याचे उपसभापतींचे आदेश

Neelam Gorhe : गोंधळामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. सत्ताधारी गोंधळ घालत असताना विरोधकदेखील उभा राहून गोंधळ घालू लागले. विरोधकांकडून ओबीसी-मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही म्हणून सत्ताधाऱ्यांना सवाल केला गेला.
Winter Session 2024
Winter Session 2024 esakal

Monsoon Session 2024 : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. बुधवारी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने उपसभापतींनी सभागृहात मार्शल बोलावण्याचे आदेश दिले.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बोलावलेल्या बैठकीला विरोधक अनुपस्थित राहिल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधकांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात सर्वत्र गोंधळ झाला.

Winter Session 2024
Maratha Reservation: आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी देशातील 3 मोठे समाज एकवटले; दिल्लीवर देणार धडक !

गोंधळामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. सत्ताधारी गोंधळ घालत असताना विरोधकदेखील उभा राहून गोंधळ घालू लागले. विरोधकांकडून ओबीसी-मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही म्हणून सत्ताधाऱ्यांना सवाल केला गेला.

Winter Session 2024
Threat To BJP Leaders: "पक्ष सोडा नाहीतर जगातून उठवू," पाच भाजप नेत्यांना धमकीचे पत्र

सत्ताधारी आणि विरोधक यांचा वाढता गोंधळ पाहता उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून मार्शल बोलवण्याचे आदेश देण्यात आले. वाढता गोंधळ पाहता नीलम गोऱ्हे यांनी दिवसभराचे कामकाज तहकूब केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com