Winter Session: कपबशा धुण्याच्या प्रकरणातील मिटकरींचा आरोप खोटा; बांधकाम विभागानं केला खुलासा

कपबशा धुण्याच्या प्रकरणातील आरोप बांधकाम विभागानं फेटाळले
Winter Session
Winter Sessionesakal
Updated on

हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरच्या आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचे पाणी वापरत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला होता. त्यावरुन चांगलाच गोंधळ माजला. पण त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चुकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर बांधकाम विभागानेदेखील यासंदर्भात खुलासा केला आहे. (Winter Session Amol Mitkari Shared Video Toilet Water Using Wash Cups allegation is false In Nagpur Mla Residence )

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन दिवसांआधी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र राज्याच्या बांधकाम विभागाने हे आरोप फेटाळत, मिटकरींनी ट्वीट केलेला व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नसून तो दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा असल्याचा खुलासा बांधकाम विभागाने केलाय.

Winter Session
Winter session : नेत्यांची अशीही 'सोय'! आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी असणार आता विशेष 'टॉयलेट'

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये आणि मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोठ फरक आहे. नागपूरच्या आमदार निवासनात चौकनी आकाराच्या टाईल्सवर बेसिंक दिसत आहे. तसेच, तेथे हिरवट रंगलीची टाईल्स पाहायाला मिळते.

Winter Session
Nagpur : ताटं शौचालयात धुण्याचा प्रकार झाल्यानंतर ज्यूस सेंटरचा मुद्दा विधानभवनात तापणार

तर मिटकरी यांनी शेअर केलेला व्हिडीओत ऑफ व्हाईट कलरची तसेच चॉकलेटी टाईल्सची पट्टी दिसत आहे. तसेच, बेसिंक अंडाआकार टाईल्सवर पाहायाल मिळत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. बांधकाम विभागाच्या या दाव्यानंतर मिटकरी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.’ आजादी का अमृतमहोत्सव.. असा टोलाही मिटकरी यांनी व्हिडीओ ट्विट करत लगावला होता. त्यानंतर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com