महाराजांचा अवमान करणारे मोदींसोबत व्यासपीठावर, आम्ही काय समजायचं? उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

मुंबई - ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच राज्यातील शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवरून भाजपला फटकारलं. (Uddhav Thakceray news in Marathi)

Uddhav Thackeray
PM Narendra Modi : चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल मोदींनी दिली महत्त्वाची माहिती; 'या' देशांचा दिला दाखला

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा लाभला आहे. मात्र याच महापुरुषांचा सातत्याने अवमान करण्यात येत आहे. राज्यपालांनी महाराजांचा अवमान केला. तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेला दिसतात, मग आम्ही काय समजायचं, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
Eknath Shinde: महिलांपेक्षा शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा महत्त्वाची? निर्भया फंडातून खरेदी केलेल्या SUV चक्क...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पार पडले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील व्यासपीठावर होते. राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. यावरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमावादावरूनही भाजपवर निशाणा साधला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील मानत नाही. पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कधी समज देणार असा प्रश्नही उध्दव यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com