
राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर सोमवारी निर्णय
मुंबई :नवनीत राणा (Navneet rana) आणि पती रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला (decision on bail application is pending) आहे. जामीन अर्जावर सोमवारी (ता. २) न्यायालय निर्णय देणार आहे. प्रदीर्घ युक्तिवादामुळे आज न्यायालयाला निकाल देता आला नाही. हनुमान चालिसा प्रकरणी तुरुंगात असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि पती रवी राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. (Withholding decision on bail application of Rana couple)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानावर हनुमान चालिसा पठण करण्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले राणा दाम्पत्य (Rana couple) सध्या तुरुंगात आहे. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांच्या विरोधात १७ गुन्हे दाखल आहेत तर खासदार नवनीत राणांविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामिनाला विरोध आहे. खोटे जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप देखील नवनीत राणा यांच्यावर आहेत.
हेही वाचा: केंद्राने जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसाठी खर्च केले ९००० कोटी; अहवाल
राणा दाम्पत्याच्या (Rana couple) वतीने दोन वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दुसरीकडे खार पोलिस ठाण्याची बाजू मांडण्यासाठी एसएसपी प्रदीप घरत न्यायालयात हजर होते. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात सांगितले की, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार पती रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची योजना साधी वाटली तरी प्रत्यक्षात ती राज्य सरकारला आव्हान देणारी होती. दोघांनाही जामीन मिळाल्यास आणि ते बाहेर पडल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा पोलिसांचा दावा आहे.
तुरुंगातील मुक्काम वाढला
गुरुवारी राणा दाम्पत्याने घरचे जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर राणा दाम्पत्यांना आज दुसरा झटका बसला. आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवल्याने (decision on bail application is pending) राणा दाम्पत्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आता न्यायालय सोमवारी कोणता निर्णय देते हेच पाहणे बाकी आहे.
Web Title: Withholding Decision On Bail Application Of Rana Couple Mondays Decision
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..