
जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. वेळेत रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध न झाल्यानं आदिवासी महिलेची रस्त्याकडेलाच साडीचा पडदा करून प्रसूती करण्यात आली. या प्रकरणी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी आरोग्य विभागाची चूक असल्याचं म्हटलंय. आरोग्य विभागाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी म्हणाले.