Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सध्या २,१०० रुपये नाहीत; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची स्पष्टोक्ती

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना महायुतीने निवडणूक काळात आश्वासित केलेले २,१०० रुपये मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.
Aditi Tatkare
Aditi Tatkaresakal
Updated on

निवडणुकीचा जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना महिना २,१०० रुपये दिले जातील, अशी स्पष्टोक्ती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना महायुतीने निवडणूक काळात आश्वासित केलेले २,१०० रुपये मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी लाडकी असणारी बहीण आता सावत्र का झाली, असा सवाल केला.

विधानपरिषदेत लाडकी बहिण योजनेचा प्रतिमहिना २,१०० रुपये लाभ कधी मिळणार याविषयीची लक्षवेधी आ. अनिल परब, प्रज्ञा सातव यांच्यामार्फत मांडण्यात आली होती. त्या लक्षवेधीला उत्तर देताना आदिती तटकरे यांनी सांगितले की, यावर्षीपासूनच लाडक्या बहिणींना महिन्याला २,१०० रुपये दिले जातील, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी किंवा मी कधीही केलेले नव्हते. निवडणुकीचा जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो. त्यामुळे या अर्थसंकल्पातच २,१०० रुपये दिले जातील असे काही नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार पार पडत आहे.

- आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com