‘लखपती दिदी’तून महिलांना मिळणार 1 ते 2.50 लाखांचे वैयक्तिक कर्ज! पावणेचार लाख महिलांना मिळणार 532 कोटींचे कर्ज; नवीन बचत गट कसा काढायचा?

जिल्ह्यातील ३५,३०१ बचत गटांतील तीन लाख ७० हजार महिलांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळ व ‘उमेद’तर्फे ५३२ कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. बचतगटांतून महिलांना स्वयंरोजगार देऊन व सक्षम बनविण्याचा प्रयत्न ‘मआविम’ व उमेदतर्फे केले जात आहे.
two levels of mental illness women empowerment
Women will get a personal loanSakal

सोलापूर : जिल्ह्यातील ३५ हजार ३०१ बचत गटांतील तीन लाख ७० हजार महिलांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळ (मआविम) व ‘उमेद’तर्फे ५३२ कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देऊन व सक्षम बनविण्याचा प्रयत्न ‘मआविम’ व उमेदतर्फे केले जात आहे.

बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्याने गावागावांतील छोटी-मोठी बेकायदा सावकारी संपुष्टात आल्याची स्थिती आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील तब्बल पावणेचार लाख महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे व ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाची चळवळ जिल्ह्यात वाढू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात ही चळवळ आणखी वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.

नवीन बचत गट कसा काढायचा?

दहा महिला एकत्रित आल्यानंतर महिलांनी त्यांच्या पसंतीनुसार नगरपरिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा उमेद यापैकी एका संस्थेकडे जाऊन त्या ठिकाणी बचत गटाची नोंदणी किंवा ठराव करायचा असतो. त्या ठरावानुसार बॅंकेत अध्यक्ष व सचिव महिलेच्या नावे खाते उघडावे लागते. त्यानंतर संबंधित संस्थेकडे या बचत गटाची ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी होते. मग, सुरवातीला १५ हजार रुपयांचा फिरता निधी दिला जातो, तो परत करावा लागत नाही. सहा महिन्यांनी ६० हजार रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी मिळतो, तो परत करावा लागतो. त्याची परतफेड व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना बॅंकांच्या माध्यमातून बचत गटासाठी कर्ज घेता येते.

महिलांना सक्षम बनविण्याचे नियोजन

गावागावातील गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडून त्यांना सक्षम बनविण्याचे नियोजन केले आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला स्वत: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थांसाठी एक मार्केटिंगचे व्यासपीठ तयार करून देण्याचेही नियोजन केले आहे.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

‘लखपती दिदी’तून यंदा वैयक्तिक कर्जही

केंद्र शासनाने महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गतवर्षी ‘लखपती दिदी’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार २०० महिलांना व्यवसायासाठी एक ते अडीच लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळणार आहे. त्यासाठी संबंधित गरजू महिलांनी तालुक्याच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. दरम्यान, जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून त्या महिलांना एकूण कर्जाच्या ३५ टक्के सबिसिडी देखील मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com