
40 वर्षांखालील जगातील सर्वात आश्वासक युवा नेतृत्वाची यादी दरवर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीनं प्रसिद्ध केली जाते.
Sanjay Raut : मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे'; संजय राऊतांचा सणसणीत टोला
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीनं (World Economic Forum) प्रसिद्ध झालेल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह देशभरातील सहा तरुण नेत्यांचा समावेश आहे.
40 वर्षांखालील जगातील सर्वात आश्वासक युवा नेतृत्वाची यादी दरवर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीनं प्रसिद्ध केली जाते. यंदाच्या यादीत राजकीय नेते, उद्योजक, खेळाडू, संशोधक यांच्यासह 100 जणांचा समावेश करण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देत खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) आदित्य ठाकरेंचं (Aditya Thackeray) कौतुक केलंय. परवा देशाला ऑस्कर मिळालं आणि काल यांचा (आदित्य ठाकरे) टाॅप 100 मध्ये समावेश झाला, याचा आम्हाला आनंद आहे. गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरे विविध क्षेत्रात राजकारण, आर्थिक, समाजकारण, पर्यावरण असेल एक मंत्री म्हणून सुध्दा आणि एक राजकीय नेते म्हणून सुध्दा जागतिक पातळीवर ठसा उमटवताहेत.
त्यांच्या समावेशामुळं आम्ही सगळे आनंदी आहोत. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचं, शिवसेनेचं आणि देशाचं राजकीय भविष्य आहे. असं मी वारंवार सांगतो त्याच्यावर हा शिक्कामोर्तब झाला आहे, असं म्हणत राऊतांनी आदित्य यांचं कौतुक केलं.
मुका घ्या मुका प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, पहिले गुन्हेगार सुर्वे आहेत, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आहे. राज्यात खोके वाल्यांच्या संपत्तीचा हिशोब मागायला हवा पण ते आमच्या संपत्तीचा हिशोब मागत आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले.