ओमायक्रॉनमधील जनुकीय बदल घातक; संसर्गाचा वेग वाढण्यास मदत

Omicron variant
Omicron variantsakal media

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दक्षिण आफ्रिका (south Africa) आणि इतर काही देशामध्ये आढळून आलेल्या कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटला (Omicron variant) व्हेरियंट ऑफ कन्सर्न असल्याचे नमूद केले आहे. विषाणू मधील या जनुकीय बदलामुळे (Genetic Mutations) त्याला काही विशेष गुणधर्म प्राप्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या बदलामुळे विषाणू प्रसाराचा वेग (increases infection diseases) वाढल्याचे सध्या दिसत आहे. मात्र यामुळे आजाराची तीव्रता वाढेल का याबाबत आताच निश्चित सांगणे कठीण असल्याचे ही तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासाठी दोन आठवडे थांबणे गरजेचे असून येत्या दोन आठवड्यात या बदल अधिक माहिती मिळू शकणार आहे.

ओमायक्रॉन प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होत आहे. त्यापैकी काही माहिती आहेत. जगभरातील संशोधक ओमिक्रॉनची संक्रमणक्षमता, तीव्रता आणि रोगप्रतिकारक बचाव क्षमता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अभ्यास करत आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक, दक्षिण पूर्व आशिया डॉ पूनम खेतरपाल सिंग यांनी सांगितले. आपल्याकडेही ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे. यामुळे सर्व देशांनी सतर्क राहणे खबरदारी घेणे गरजेचे आहे. ओमायक्रॉनची प्रकरण शोधून काढणे तसेच व्हायरसचा पुढील प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही खेतरपाल म्हणाल्या. ओमायक्रॉनची लक्षणे कोरोना प्रमाणेच प्रमाणेच आहेत. सरकारद्वारे सर्वसमावेशक आणि अनुरूप सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय आणि व्यक्तींनी प्रतिबंधात्मक आणि सावधगिरीच्या उपायांचे कठोर पालन करणे आवश्यक आहे. असेही त्या पुढे म्हणाल्या.

लोकांनी त्यांचे नाक आणि तोंड चांगले झाकणारा मास्क घालावा, अंतर ठेवावे, हवेशीर किंवा गर्दीची जागा टाळावी, हात स्वच्छ ठेवावे, खोकतांना आणि शिंकतांना रुमाल वापरावा तसेच कटाक्षाने लसीकरण करावे. सर्व प्रवाशांनी सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपायांचे नेहमी पालन केले पाहिजे आणि कोविड-19 च्या चिन्हे आणि लक्षणांसाठी जागरुक राहिले पाहिजे असेही त्या पुढे म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com