
१२ बंडखोर खासदारांना Y श्रेणीची सुरक्षा; लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते पत्र
नवी दिल्ली : शिवसेनेच्या १२ खासदारांना काल रात्रीपासून वाय श्रेणीची सुरक्षा (Y category security) देण्यात आली आहे. या १२ खासदारांनी सोमवारी लोकसभा अध्यक्षांना पत्र (letter) लिहिले होते. यापूर्वी या १२ खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहून राहुल शेवाळे यांना नेता म्हणून मान्यता देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांच्या पत्रावर सभापतींनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
राजन विचारे यांना मुख्य व्हीप बनवण्याच्या अर्जावर सभापतींनी कोणताही निर्णय न घेतल्याने १२ खासदारांच्या मते चीफ व्हीप भावना गवळी आहे. शिवसेनेच्या (Shiv sena) निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगात दावा सांगण्याबाबत सभापतींच्या निर्णयानंतरच पुढचे पाऊल उचलले जाईल, असे बंडखोर गटाने म्हटले आहे.
हेही वाचा: अग्निपथ योजना : जात प्रमाणपत्रावर लष्कराकडून स्पष्टीकरण, म्हणाले...
शिवसेनेने सोमवारी सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज दाखल केला की, विनायक राऊत यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षापासून फारकत घेतलेल्या गटाच्या कोणत्याही प्रतिनिधित्वाचा विचार करू नका, असे आवाहन पक्षाने केले आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सभापतींना पत्र सादर केले आहे. त्यात राजन विचारे यांना मुख्य प्रतोद केल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या संसदीय पक्षाचा नेता असल्याचा खोटा दावा करणाऱ्या इतर कोणत्याही खासदाराने केलेले निवेदन किंवा चीफ व्हीप किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने जारी केलेले कोणतेही निर्देश/व्हीप स्वीकारू नका किंवा त्याचा विचार करू नका, असे राऊत म्हणाले. शिवसेनेचा संसदीय पक्ष फुटू शकतो आणि पक्षाच्या १९ खासदारांपैकी किमान डझनभर खासदार लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी करू शकतात, असे वृत्त आहे.
Web Title: Y Category Security Letter Lok Sabha Speaker Om Birla
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..