
मुंबई : १९९३ मधील मुंबईतील बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या कबरीच्या शुशोभिकरणावरुन राज्यात वाद पेटला आहे, दरम्यान या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दहशतवादी विचारांना कोणी संरक्षण देत असेल तर असे लोक समोर आले आहेत, देवेंद्र फडणवीसांनी या संबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मी या निर्णयाचं स्वगत करतो असे मुनगंटीवार म्हणणाले. या प्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या नेतृत्वात चौकशी होणार आहे. एलटी मार्ग पोलिस ठाण्याचे आधिकारी देखील तपास करणार आहेत. वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडून याबाबत माहिती घेण्यात येत आहे. या कबरीचे सुशोभिकरण कोणी केले याचा शोध घेतला जाणार आहे.
दरम्यान या मुद्द्यावर शिवसेना-भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या वादावर बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर त्यांनी पलटवार केला आहे. निवडणुका जवळ आल्या की असे मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जातात, असा आरोप त्यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं? काय आरोप करावेत? याच्यामध्ये काहीतरी भान ठेवणं गरजेचं आहे. कारण आज जे आरोप झाले आहेत ते खोटे आणि कोणालाही पटणारे नाहीत. धार्मिक वाद निर्माण करायचे नवीन काहीतरी सुरु करायचं म्हणून असे आरोप करणं कितपत योग्य आहे. या प्रकरणात दोन-तीन गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. याकूब मेमनला दहशतवादी म्हणून फाशी दिली गेली. मात्र त्यानंतर त्याचं दफन एवढ्या मान-सन्मानानं झालं की त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याचा मृतदेह समुद्राच्या तळाशी दफन करण्यात आला. तसंच याकूब मेमनबाबत का झालं नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.
दरम्यान मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता, या कबरीभोवती मार्बल आणि एलईडी दिवे लावण्यात आल्याने गोधळ उडाला होता, त्यानंतर हा प्रकार समोर येताच मुंबई पोलिसांनी कबरीभोवतीचे एलईडी दिवे काढण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.