Video : बंडखोर यामिनी जाधव उभ्या राहताच विधानसभेत EDच्या घोषणा

yamini jadhav shivsena mla on opposition benches shouted ed ed at assembly speakers election video
yamini jadhav shivsena mla on opposition benches shouted ed ed at assembly speakers election video

मुंबई : आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, या निवडणूकीत भाजपाकडून राहुल नार्वेकर रिंगणात होते, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले.दरम्यान निवडणूकी दरम्यान भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना आमदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. (yamini jadhav shivsena mla on opposition benches shouted ed ed at assembly speakers election video)

आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान यामिनी जाधव जेव्हा नाव आणि क्रमांक सांगण्यासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा विरोधी आमदारांनी 'ईडी ईडी' म्हणत त्यांना डिवचलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत ३९ आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीतील हॉटेल गाठलं. त्यांच्या या बंडात यामिनी जाधव देखील शिवसेना पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोर आमदारांना सामील झाल्या.

विधानसभा अध्यक्षांच्या मतदानाच्या वेळी आमदार उभे राहिल्यानंतर आमदारांनी वेगवेगळ्या प्रकरचे शेरेबाजी करत घोषणा दिल्या. शिंदे गटाचे प्रताप सरानईक आणि यामिनी जाधव हे दोघे जेव्हा मतदान करण्यासाठी उभे राहीले तेव्हा, "ईडी ईडी'' अशा घोषणा देण्यात आल्या.

yamini jadhav shivsena mla on opposition benches shouted ed ed at assembly speakers election video
काँग्रेसनं बंडखोर आमदारांना शहाजी पाटील स्टाईलनं डिवचलं; म्हणे, ५० खोके...

कोण आहेत यामिनी जाधव..

यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असून त्यांना मातोश्रीच्या जवळच्या समजल्या जात, तसेच मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर ईडीने कारवाई केली, तसेच त्यांची प्रॉपर्टीही ईडीने सील केलीय. याच ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी यामिनी जाधव यांनी शिंदे गट-भाजपशी जुळवून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

yamini jadhav shivsena mla on opposition benches shouted ed ed at assembly speakers election video
कारशेड 'आरे'तच.. सुमीत राघवनचे शिंदे सरकारला समर्थन.. ट्विट करत म्हणाला..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com