Yashomati Thakur: यशोमती ठाकुरांची तुलना थेट इंग्रजांशी; भाजप खासदाराच्या वादग्रस्त विधानामुळं वाद पेटणार

काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती यांच्यावर टीका करताना भाजपच्या खासदाराने वादग्रस्त विधानामुळे केली आहे
Yashomati Thakur
Yashomati ThakurSakal

काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती यांच्यावर टीका करताना भाजपच्या खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. "इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना 'ठाकूर' पदवी मिळाली. ठाकूरांमध्ये इंग्रजांचा 'डीएनए'," असं वादग्रस्त वक्तव्य राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.

भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघ तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना अनिल बोंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे," असंही बोंडे पुढे म्हणाले आहेत.

Yashomati Thakur
Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा! मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून वाद

भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरु आहे. काल (सोमवारी) ही यात्रा अमरावतीमध्ये होती. यानिमित्ताने अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. दरम्यान या यात्रेवरून यशोमती ठाकूर यांनी भाजपला टोला लगावला होता. "निवडणुका आल्या की भाजपला असे धंदे सुचतात," अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्याला अनिल बोंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Yashomati Thakur
Afghanistan earthquake : अफगाणिस्तान भूकंपात तब्बल 4,000 लोकांचा बळी; 2,000 हून अधिक घरं उद्ध्वस्त

भाजपची ओबीसी यात्रा ही राज्यभरात सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सुमारे ४४ विधानसभा व नऊ लोकसभा मतदार संघातून ही यात्रा जाणार आहे. यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आमदार डॉ. आशिष देशमुख व ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते करत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com