esakal | 'मनी हाईस्ट'वरुन यशोमती ठाकूर यांचं राजकीय ट्वीट; म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Yashomati Thakur

'मनी हाईस्ट'वरुन यशोमती ठाकूर यांचं राजकीय ट्वीट; म्हणाल्या...

sakal_logo
By
सुधीर काकडे

चोरांच्या एका टोळीवर आधारित असणारी मनी हाईस्ट (Money Heist) ही वेब सीरीज सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत लाखो लोकांनी पाहिली असुन वेब सीरीज आणि त्यातील पात्रांचे वेगवेगळ्या चर्चा आणि मिम सध्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. ही वेब सीरीज सध्या इंटरनेवर ट्रेंडींगमध्ये आहे. महिला व बालविकास मंत्री आणि कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी केलेले एक ट्विट सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसते आहे.

मनी हाईस्ट बद्दल लिहीताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘तो लुटायलाच आलेला आहे. मात्र त्याने जगासमोर स्वत:च असं चित्र उभं केलंय जसं की तो मसीहाच आहे. मी राजकीय विषयांवर नाही तर मनी हाईस्ट या वेब सिरीज बद्दल बोलतेय. गैरसमज झाल्यास योगायोग समजावा.’ असे म्हणत खोचक टीका केली आहे. यशोमती ठाकूर या सोशल मिडीयावर सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असतात.

हेही वाचा: राजू शेट्टींचं नाव आम्ही राज्यपालांच्या यादीतून वगळलं नाही - शरद पवार

दरम्यान, देशात सध्या इंधनाच्या आणि गॅसच्या किमती वाढत असल्याने लोकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारने सरकारच्या बऱ्याच मालमत्तांचे खासगीकरण केल्याने विरोधीपक्षाने या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

loading image
go to top