यशवंत जाधवांच्या घरातून 2 कोटींसह 10 बॅक लॅाकर्स जप्त

तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरूच आहे.
यशवंत जाधवांच्या घरातून 2 कोटींसह 10 बॅक लॅाकर्स जप्त
Updated on

दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयटी विभागाचे छापे पडले आहेत. आधी नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई आणि आता जाधव यांच्यावर आयटीचे छापे यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता महाविकास आघाडीतील नेत्यांवर झालेल्या या कारवाईमुळे आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, यशवंत जाधव यांच्या अडचणींत वाढ सुरुच आहे. तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरू आहे.

यशवंत जाधवांच्या घरातून 2 कोटींसह 10 बॅक लॅाकर्स जप्त
उत्तर प्रदेशात निवडणुकीनंतरच चित्र कसं असेल? संजय राऊतांनी केलं भाकीत

आयकर विभागाने जाधव यांच्या घरातून दोन कोटी रुपये (Income Tax Seizes CASH) जप्त केले आहे. त्याचे दहा बॅंक खात्यातील लॅाकर्स जप्त करण्यात आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. आज तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांची कसून चौकशी करत आहेत. आयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्याच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटुंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटुंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे.

दरम्यान, शुक्रवारी (25 फेब्रुवारी) सकाळी साधारणत: सात वाजता आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला होता. तेव्हापासून चौकशी सुरू आहे. आयकर विभागाची ही चौकशी अजूनही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरी छापा मारला.

यशवंत जाधवांच्या घरातून 2 कोटींसह 10 बॅक लॅाकर्स जप्त
Ukraine Russia War : हंगेरीमधून भारताकडे तिसरे विमान रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

mantralay
Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Marathi News Esakal
www.esakal.com