
Action On Judge Yashwant Verma: न्यायधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात कथितरीत्या मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी रक्कम मिळाल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना अहवाल सादर केला आहे.
सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी समितीचं गठण केलं आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत यशवंत वर्मा यांना न्यायालयीन कामकाज करता येणार नाही. तीन सदस्यीय चौकशी समितीमध्ये पंजाब, हरियाणा आणि कर्नाटकचे चीफ जस्टीत आहेत. चीफ जस्टीस शील लागू, चीफ जस्टीस जीएस संधावालिया आणि चीफ जस्टीस अनू शिवरामन हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.