
अविनाश साबापुरे
यवतमाळ : वाघांची संख्या वाढत असलेले टिपेश्वर अभयारण्य आणि वाघांसाठी उत्तम ‘कॉरिडॉर’ असलेले पैनगंगा अभयारण्य यांना व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची शिफारस भारतीय वन्यजीव संस्थेने केली आहे. केंद्रीय वन मंत्रालयाकडे गेलेल्या या शिफारशीमुळे महाराष्ट्राला नवा व्याघ्र प्रकल्प मिळण्याची शक्यता बळावली आहे. तसेच हे दोन्ही अभयारण्य कुशीत जोजविणार्या यवतमाळ जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.