
धाराशिव : येडशी अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्यासाठी प्रतिकूल परिस्थिती बघून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडण्याची शिफारस व्याघ्र सनियंत्रण समितीने घेतली आहे. तशी शिफारस वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आली आहे. त्यानंतर या वाघाला नैसर्गिकपणे संचार करू द्यायचा की त्याला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडायचे, याचा निर्णय राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक निर्णय घेणार आहेत.