Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज पावसाचा 'यलो अलर्ट'; हवामान विभागाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Rain Update

गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज पावसाचा 'यलो अलर्ट'; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update : दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलीय. पुणे (Pune), मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापुरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात झालीय. त्यातच आता विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावण्यास सुरुवात केलीय.

गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी (Ganesh Visarjan 2022) पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालाय. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसानं हजेरी लावलीय. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावासाचा इशारा दिलाय.

हेही वाचा: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात 11 सप्टेंबरला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक संथ गतीनं सुरु होती. विसर्जनावेळी जोराचा पाऊस सुरु होता. आता पुन्हा हवामान विभागानं 'यलो अलर्ट'चा इशारा दिला आहे.

हेही वाचा: Rajasthan : जीप-ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Web Title: Yellow Alert For Rain In Maharashtra Today Meteorological Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..