esakal | बावीसशे कोटींच्या संपत्तीवर ‘सक्तवसुली’ने आणली टाच
sakal

बोलून बातमी शोधा

Rana-Kapoor

येस बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २२०० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ही मालमत्ता येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर, धीरज व कपिल वाधवा यांच्याशी संबंधित आहे. त्यात न्यूयॉर्क, लंडन, ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांचा समावेश आहे.

बावीसशे कोटींच्या संपत्तीवर ‘सक्तवसुली’ने आणली टाच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - येस बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २२०० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ही मालमत्ता येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर, धीरज व कपिल वाधवा यांच्याशी संबंधित आहे. त्यात न्यूयॉर्क, लंडन, ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘ईडी’कडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या मालमत्तांचे बाजारभाव २६०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. त्यातील दिल्ली, लंडन व न्यूयॉर्क आदी १२०० कोटी रुपयांची मालमत्ता राणा कपूरशी संबंधित आहे; तर पुणे, मुंबई, ऑस्ट्रेलिया, लंडन आदी ठिकाणांची १४०० कोटींची मालमत्ता डीएचएफएलशी संबंधित आहेत. या प्रकरणात १२ फ्लॅटसह न्यूयॉर्क, लंडन, ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांवर टाच आणल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.  

मुंबईला नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आले आणि...

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबंधित असलेल्या नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी संबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेडला कर्ज देण्यात आले होते. या कंपनीत कपूर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समभाग आहेत. त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बॅंकेचे ३ हजार ७०० कोटींचे कर्ज होते. राणा कपूर येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या. हे कर्ज देताना गहाण ठेवलेल्या मालमत्तेची किंमत ४० कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किमतीचे असल्याचे दाखवण्यात आले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी मालमत्तांवर ईडीची नजर
राणा कपूर व कुटुंबीयांशी संबंधित मुंबईतील फ्लॅट व  इतर काही मालमत्ता गुरुवारी ईडीने आपल्या ताब्यात घेतल्या. अजून काही दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी मालमत्तांवर ईडीने टाच आणण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी याप्रकरणी ५० कोटींच्या मालमत्तेवर ईडीतर्फे टाच आणण्यात आली होती.

राणा कपूरच्या या मालमत्तांवर टाच (बाजारभाव १४०० कोटी रुपये)

  • कंबाला हिल येथील इमारत
  • नेपियन सी रोड येथील तीन ड्युप्लेक्‍स
  • नरिमन पॉईंट येथील फ्लॅट
  • वरळीतील चार फ्लॅट
  • दिल्लीतील अमृता शेरगिल मार्ग येथील मालमत्ता

Edited By - Prashant Patil