मुंबईला नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आले आणि...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

वाघोलीत आज नऊ रुग्णांची भर पडली तर केसनंद येथे 2 व आव्हाळवाडी येथे एका रुग्णांची भर पडली. नऊ पैकी आधीच्या बाधिताच्या संपर्कातील तीन बाधित आहेत. एकाला घरी सोडण्यात आले. एकूण आकडा 87 वर पोहचला असून 62 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

वाघोली - वाघोलीत आज नऊ रुग्णांची भर पडली तर केसनंद येथे 2 व आव्हाळवाडी येथे एका रुग्णांची भर पडली. नऊ पैकी आधीच्या बाधिताच्या संपर्कातील तीन बाधित आहेत. एकाला घरी सोडण्यात आले. एकूण आकडा 87 वर पोहचला असून 62 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये  9 वर्षांच्या मुलापासून ते 72 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. लोहगाव रोडवरील एका सोसायटी मधील 2, भावडी रोड फुलमळा येथील 3, संत तुकाराम नगर येथील एक कुटुंबातील दोन, भावडी रोड व नगर रोड लगतच्या एक मोठ्या सोसायटी मधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. या भागात रुग्ण सापडल्यानं आता या ठिकाणी रेड झोन घोषित झाल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहेत. 

Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर! 

दरम्यान, आज आढळलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. ते दोघेही मुंबई इथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये  दोन महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे. 

पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन!

केसनंद मधील रुग्ण संख्या सात वर पोहचली आहे. तर आव्हाळवाडी मध्ये दोन रुग्ण आहेत. दरम्यान आज पासून संपूर्ण गावच बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने केवळ अत्यावशक सेवा सुरू होत्या. वाघोली प्राथमिक केंद्र अंतर्गत एकुण 7 गावे आहेत. सात पैकी वडगाव शिंदे वगळता 6 गावात रुग्ण आढळून आले आहेत. या सहा गावातील रुग्णांनी शतक पार केले आहे. एकूण रुग्णांची संख्या 108 वर पोहचली असून 32 रुग्ण ठठणीत बरे झाले आहेत. तर 74 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!

गावे एकूण रुग्ण, कंसात बरे झालेले व ऍक्टिव्ह रुग्ण 
1) वाघोली - एकूण रुग्ण - 87 ( बरे झालेले - 25 ) - ( ऍक्टिव्ह - 62 )
2) केसनंद - एकूण रुग्ण -  7 ( बरे झालेले - 2 ) ( ऍक्टिव्ह - 5 )
3) कोलवडी - एकूण रुग्ण - 1 ( ऍक्टिव्ह - 1 ) 
4) मांजरीखुर्द - एकूण रुग्ण - 9 ( बरे झालेले - 4 ) - ( ऍक्टिव्ह - 3 ) ( मृत्यू - 2 )
5)  आव्हाळवाडी - एकूण रुग्ण - 2 ( ऍक्टिव्ह - 2 )
6)   निरगुडी - एकूण रुग्ण - 2 ( ऍक्टिव्ह - 2 )

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wagholi 9 new covid pateint on thursday two from one family