‘एटीएम’ कार्ड नसले तरी काढता येणार पैसे! एटीएम कार्ड नसले किंवा पासवर्ड विसरला तर घाबरू नका, ‘फोन पे’च्या स्कॅनरवरून काढता येईल रक्कम, वाचा...

अनेकदा तो मोबाईल जवळ नसतो. त्यावेळी बॅंक खात्यात हजारो रुपये असूनही ‘एटीएम’मधून काढता येत नाहीत. अशावेळी मोबाईलमधील ‘फोन पे’च्या स्कॅनरवरून एटीएममधून आपल्या खात्यातील पैसे काढता येतात.
एटीएम केंद्र

एटीएम केंद्र

solapur

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : बॅंकांच्या ग्राहकांसाठी एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता धनादेश देखील एकाच दिवसात क्लेअर होतो. याशिवाय आपल्याजवळ डेबिट कार्ड नसल्यास किंवा पासवर्ड विसरला असाल, तरीदेखील एटीएममधून ‘फोन पे’च्या स्कॅनरद्वारे स्वत:च्या खात्यातील पैसे काढता येतात, अशी सोय उपलब्ध आहे.

बॅंकिंग क्षेत्रात अलीकडे खूपच ग्राहकांसाठी चांगले बदल झाले आहेत. पूर्वीसारख्या बॅंकांमधील ग्राहकांच्या रांगा आता दिसत नाहीत. ‘एटीएम’मध्ये पैसे काढायला गेल्यावर अनेकदा चोरटे ग्राहकांची फसवणूक करतात. ‘एटीएम’ मशिनमध्ये कार्ड घालूनही पैसे बाहेर येत नसतात, तेव्हा कार्डची अदलाबदल करून अनेकांना चोरट्यांनी गंडा घातला आहे. या पार्श्वभूमीवर आता डेबिट कार्ड नसेल तरीदेखील मोबाईलमधील फोनचच्या स्कॅनरचा उपयोग करून एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.

सुरवातीला डेबिट की क्रेडिट कार्ड हे निवडावे लागते. आपल्या बॅंक खात्यातून किती पैसे काढायचे ती रक्कम टाकावी लागते. त्यानंतर ‘पासवर्ड (पिन)’चा पर्याय निवडताना त्याखाली एक स्कॅनरचा पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यास एटीएमच्या स्क्रीनवर स्कॅनर ओपन होतो. त्यानंतर आपल्या मोबाईलमधील फोनवर तो स्कॅनर स्कॅन करावा लागतो. त्यानंतर आपल्याला अपेक्षित रक्कम बॅंक खात्यातून मशीनमधून बाहेर येते अशी ही प्रक्रिया आहे.

‘एटीएम’चा पासवर्ड विसरला, तरी...

गडबडीत अनेकदा डेबिट कार्ड घरी विसरले जाते. कधी कधी कार्ड सोबत असताना ‘एटीएम’ केंद्रावर गेल्यावर पासवर्ड आठवत नाही. त्यावेळी बॅंक खात्याला लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे पासवर्ड नवीन तयार करता येतो. गुगलवर बॅंकेचे नाव टाकूनही तो नवीन पिन तयार करता येतो. परंतु, अनेकदा तो मोबाईल जवळ नसतो. त्यावेळी बॅंक खात्यात हजारो रुपये असूनही ‘एटीएम’मधून काढता येत नाहीत. अशावेळी मोबाईलमधील ‘फोन पे’च्या स्कॅनरवरून एटीएममधून आपल्या खात्यातील पैसे काढता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com