सोलापुरात तरुण वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट; चिठ्ठीत लिहिले ‘माझ्या आत्महत्येला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा व्हावी’

सोलापुरातील एका तरुण वकिलाने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. सागर श्रीकांत मंद्रुपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एसआरपी कॅम्पजवळ, सोलापूर) असे त्या वकिलाचे नाव आहे. पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. चिठ्ठीत वहीच्या पानाच्या समोरील बाजूला पेनने तर मागील बाजूला पेन्सिलने लिहिलेले आहे.
advocate sucide

advocate sucide

sakal solapur

Updated on

सोलापूर : सोलापुरातील एका तरुण वकिलाने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १२) घडली. सागर श्रीकांत मंद्रुपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एसआरपी कॅम्पजवळ, सोलापूर) असे त्या वकिलाचे नाव आहे. पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. चिठ्ठीत वहीच्या पानाच्या समोरील बाजूला पेनने तर मागील बाजूला पेन्सिलने लिहिलेले आहे.

सचिन कौटुंबिक कारणातून तणावाखाली होता. पत्नीसोबतही वाद होता. त्याला दोन मुले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता. ११) रात्री ॲड. सागर व त्याची आई, यांच्यात वाद झाला होता. रात्री उशिरा सागरचे आई-वडील त्यांच्या खालच्या मजल्यावरील घरात झोपी गेले. सागर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत झोपायला गेला. सकाळी उठल्यावर वडील नेहमीप्रमाणे शासकीय नोकरीवर गेले. आईनेदेखील नेहमीप्रमाणे तो उशिरा खाली येईल म्हणून त्याकडे लक्ष दिले नाही. सकाळची सगळी कामे करून ती झोपी गेली. दुपारी चार वाजता उठल्यावर अजूनही सागर खाली आला नव्हता. त्यामुळे आईने भावाला बोलावून घेतले.

सागरची आई व मामा त्याच्या खोलीजवळ पोचले. दरवाजा उघडून आत पाहिल्यावर सागरने गळफास घेतल्याचे दिसले. बेशुद्धावस्थेत त्याला खाली उतरवले, तोपर्यंत विजापूर नाका पोलिसांना याची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी सागरला बेशुद्धावस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पण, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नेल्यावर डॉक्टरांसमोर पोलिसांना सागरच्या बनियनमध्ये सुसाईड नोट सापडली. दरम्यान, रात्री उशीर झाल्याने उत्तरीय तपासणी उद्या (गुरुवारी) होणार आहे.

पोलिसांनाच सापडेल अशी ठेवली सुसाईड नोट

डॉक्टरांनी मयत घोषित केल्यावर पोलिसांनी ॲड. सागरला सिव्हिल हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागात नेले. त्यावेळी त्याच्या अंगावरील टी-शर्टच्या आतील बनियनमध्ये सुसाईड नोट सापडली. पोलिसांनाच सापडावी, अशा उद्देशाने त्याठिकाणी त्याने सुसाईड नोट ठेवली होती. त्यात ‘माझी आई मला व माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती. मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची. ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती. तिला कडक शिक्षा व्हावी’, असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com