दिव्यात खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी: घटना सीसीटीव्हीत कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

दिव्यात खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी: घटना सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली: दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथील रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यांनी एका तरुणाचा बळी घेतला असल्याची घटना घडली आहे. गणेश पाले असे मृत तरुणाचे नाव असून हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दिव्यातील रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून काम न झालेल्या रस्त्यांची खड्ड्यानी चाळण झाली आहे.

या घटनेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत कामांच्या फक्त कागदावर घोषणा होत आहेत पण कामं होत नाहीत.अजून किती बळी घेणार? असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सुद्धा ट्विट करत दिवा आगासन रोडवर अजून ठाणे महापालिका किती लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे ? असा सवाल महापालिका प्रशासनाला केला आहे.

गेल्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश उत्सव जवळ आल्याने सर्वजण खरेदीसाठी लगबग करू लागले आहेत.त्यातच दिवा शहरात रात्री 8 वाजत्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे आहेत. या रस्त्यावरून गणेश हा रात्री 8 प्रवास करत होता. रस्त्यावर खड्डे असल्याने तो आपली दुचाकी हळुवार चालवत, खड्डे चुकवत जात होता.

मात्र असाच एक मोठा खड्डा चुकवत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. तेवढ्यात एका ट्रकच्या खाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान यापूर्वीही याच रस्त्यावर अपघात झाले आहे.मात्र ठाणे महापालिकेच अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. एककीकडे महापालिकेचे अधिकारी स्मार्ट सिटीचे पुरस्कार घेऊन आपली प्रशंसा करत आहेत, रस्त्याच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

आता या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आले असून मनसे आणि भाजपने ठाणे महापालिका ट्विट करत अजून किती बळी घेणार असा सवाल केला आहे.मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून सांगितले की दिवा ठाण्यात आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री दिव्यात आज पुन्हा एकदा खड्यामुळे बळी गेला.

कामांच्या फक्त कागदावर घोषणा होत आहेत पण कामं होत नाहीत. पालिका अजून किती बळी घेणार? तर दुसरीकडे भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले की सदर रस्त्याचे काम चालू आहे,त्यामुळे या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.

Web Title: Young Man Killed Pothole Lamp Incident Caught Cctv

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..