

solapur city police
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि चालक शिपाई या दोघांनी चोरट्यालाच एका गुन्ह्यात मदत केली. यात दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्शन केले. यावेळी त्यांनी, ‘पोलिस दलात भरती झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत तुमच्या नावापुढे ‘पोलिस’ लागलेले असते. तुमच्या चुकीच्या कामामुळे तुमची वैयक्तिक नाही, तर पोलिस खात्याची बदनामी होते. त्यामुळे चुकीचे काम करू नका,’ असा सल्ला सर्व अधिकारी व अंमलदारांना दिला.
सांगलीतील तरुण शेतकऱ्याला स्वस्तात सोने देतो, असे सांगून आठ जणांनी २८ लाख रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांची गाडी वापरण्यात आली होती. काही पैशांसाठी सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक अतुल न्यामणे व चालक शिपाई आकाश राठोड यांनी चोरट्यांना मदत केली होती. यामुळे शहर पोलिसांची राज्यभर बदनामी झाली. त्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सर्व नोंदवह्यांची पडताळणी केली.
पोलिस आयुक्त कार्यालयातील विशेष पथक, आस्थापना शाखेतील कर्मचारी व अंमलदारांनी पोलिस ठाण्यातील सर्व नोंदवह्या, दाखल गुन्हे, गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल, पोलिस ठाण्याला मिळालेला निधी व त्याची विल्हेवाट अशा सर्व बाबींची तपासणी केली. चार दिवसांच्या इन्स्पेक्शननंतर मंगळवारी (ता. २८) पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांचीही उपस्थिती होती. काही दिवसांपूर्वीच या पोलिस ठाण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तांनी जाणून घेतल्या अडचणी
सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांना पोलिस आयुक्तांनी सामाजिक बांधिलकीचे धडे दिले. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदारांना बोलावून त्यांच्या वैयक्तिक व प्रशासकीय अडचणी (प्रशासकीय बदली, विनंती बदली) जाणून घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.