सोशल मीडियावर तरुणाईंकडून 'या'चा वापर वाढतोय, कोणत्या आहेत त्या गोष्टी, जरुर वाचाच...

सोशल मीडियावर तरुणाईंकडून 'या'चा वापर वाढतोय, कोणत्या आहेत त्या गोष्टी, जरुर वाचाच...

प्रत्येकाच्या हातात आजकाल मोबाईल हा असतोच.  या मोबाईलचा वापर करून सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर तरुणाई नेहमीच असते. सोशल मीडियावर तरुणांईचा वापर  दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतो. डिजिटली प्रचंड डिजिटल ॲक्टिव्ह असलेली तरुणाई मेसेजेसद्वारे संवाद सुरू असताना प्रसंग पाहून लगेच त्याची मांडणी शॉर्ट इमोजीद्वारे पोस्ट करतअसते . सोशल मीडियावर तरुणाई मुक्तपणे व्यक्त होत असल्याने समोरच्या व्यक्तीकडून  पटकन प्रतिसाद मिळतो. 

WhatsApp वर डार्क आणि फेंन्ट सर्व इमोजी मिळून एकूण तीन हजार तीन इमोजी आहे. त्यात फक्त सिंगल इमोजी पाहिले असता एक हजार सहाशे बासष्ट ईमोजी असून त्यामध्ये १३६ लोकप्रिय इमोजींचा वापर तरुणांईकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
व्हॉट्सअॅपवर मेसेज करताना आपण आता त्यातील एक उदा. पाहूयात..

एकजण आरामात चालत आहे आणि त्याच्या मागे चावी असा व्हॉट्सअॅपवर तुम्हाला कधी मेसेज आलाय का...?  काय आहे याचा अर्थ... तुम्हाला माहितीये का...? तरुणींच्यामते त्याचा अर्थ 'चालतंय की ' असा आहे. हे फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितले. तसे अनेक शॉर्टकट इमोजीचा वापर सध्या तरुणाई त्यापध्दतीने करत आहे. सध्याच्या युगात तरुणाई काय करेल आणि कसं वागेल याचा काही नेम नाही. त्यात सोशल मीडियाच्या सपोर्ट असेल तर विचारूच नका.

झटपट संपर्क, छोटा संदेश, वेळेची बचत व पर्यायाने काम मार्गी लावण्याची वाढलेली क्षमता हे बदल तरुणाईत दिसत आहेत. इमोजी हे आजच्या डिजिटल युगामध्ये संवादाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक गोष्टी बोलताना आपण रोजच WhatsApp वरून काही ना काही शेअर करतोच त्यावेळी एक्सप्रेस होण्यासाठी आपण इमोजी वापरतो.

जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. उपकरणे व संदेशाच्या मर्यादा यातून विचार, प्रतिक्रिया व्यक्त करण्यावर बंधने आली. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. धकाधकीच्या जीवनात वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या वाक्यानुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ ने ती मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्‍या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होताना पाहावयास मिळत आहे.

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने तरुणाई साहित्यापासून दूर जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सोशल मीडिया अभिव्यक्तीचे साधन झाल्याने तरुणाई त्यावर वाचू व मुक्तपणे लिहू लागली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, मेसेंजर आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाई एकमेकांशी चर्चा करताना वापर करत आहे. काही जण फेसबुकवर पोस्ट करताना व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवतात.

सोशल मीडियावर क्रांती झाल्यावर तरुणाईचा पुस्तकाशी येणारा संबंध कमी होईल असे अनेकांचे मत होते. मात्र हे समज तरुणाईनी खोटं ठरवली आहे. सध्याची तरुणाई नव्या वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर  करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरील तरुणांईच्या या लेखनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या तरूणाईचे नवे साधन म्हणून नावाजलेल्या सोशल मीडियाकडे अनेक जण आकर्षिले गेले आहेत.

यावेळी या विषयावर बोलताना प्रा. राजशेखर शिंदे म्हणाले की, सध्या इंटरनेटची जाळे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे. सोशल मीडियातील शॉर्ट मेसेजेसमुळेच कल्पनाविस्तार संपत आहे. सलगपणे दीर्घ विचार करण्याची प्रवृत्ती या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तरुणाईमधील भाषिक प्रवृत्ती संपत आहे. त्यांच्यात नवीन शब्द घडवण्याची क्षमता दिसत नाही.

यावेळी युवक सुनिल लच्छाण म्हणाले की, आजची तरुणाई फास्ट जीवनात वेळ वाचवण्यासाठी सोशल मीडियावर चॅटिंग करताना शॉर्टकट व इमोजीचा वापर करत आहे. कोणतीही रिअॅक्शन करायची असेल तर जीआयएफने समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे समजते. तरुणांमध्ये सध्या याच शॉर्टकिजचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यात त्यांची कल्पता आहे. यातून वेळ वाचतो आणि एकमेकांना यातून भावनाही समजते. यामुळे तरुणींचा कल शॉर्टकट इमोजी वापरण्याकडे जास्त सुरू आहे.

youth are using these emojis frequently on social media

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com