खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, 'सामना'तून काँग्रेसवर निशाणा

sanjay raut
sanjay raut
Updated on

मुंबई : काँग्रेसकडून सतत व्यक्त करण्यात येत असलेल्या नाराजीबाबत आज शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून समाचार घेण्यात आला आहे. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला चिमटा काढण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत असलेले काँग्रेसचे नेते माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त करत असताना आज सामानातून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीवर सामानातून भाष्य करण्यात आले.

अग्रलेखात पुढे म्हणले आहे की काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे.

बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या काँग्रेस नेत्यांचाही अग्रलेखात उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणे तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच.‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू’असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली आणि तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की ‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये आमचेही ऐका’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

विधान परिषदांच्या जागांवर देखील अग्रलेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. चव्हाण-थोरातांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायलाच हवे. कारण सरकारचा तिसरा पाय काँग्रेसचा आहे. राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद जागांच्या समान वाटपाचा मुद्दा आहे. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 44. शिवसेना 56 आणि इतर जोडीदार पकडून 64, तर राष्ट्रवादीचे 54. त्यामुळे या प्रमाणात वाटप व्हायला हरकत नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.

sanjay raut comment on congress by saamana about congress upset in government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com