esakal | 'तुम्हीही होऊ शकता एक दिवसाचे मुख्यमंत्री'
sakal

बोलून बातमी शोधा

CM-for-a-day

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने 'वेक अप महाराष्ट्र' या अभियानांतर्गत ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी 6 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

'तुम्हीही होऊ शकता एक दिवसाचे मुख्यमंत्री'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जर तुमच्याकडे व्हिजन, नेतृत्व, सादरीकरण क्षमता आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात भन्नाट कल्पना असतील, तर तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री होऊ शकता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. 'मैं भी नायक... CM for a day' असे या स्पर्धेचे नाव असून राज्यातील कल्पक युवांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने 'वेक अप महाराष्ट्र' या अभियानांतर्गत ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी 6 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्पर्धकांना महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात विविध सूचना, कल्पना, विचार, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, वक्तृत्व, अभिनय, एकपात्री या माध्यमातून कल्पक सादरीकरण करायचे आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून अंतिम स्पर्धेसाठी 2 स्पर्धक निवडले जाणार असून अंतिम स्पर्धा मुंबईमध्ये होणार आहे. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या अंतिम 5 विजेत्यांना CM for a day (एका दिवसाचे मुख्यमंत्री) म्हणून पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस शासकीय कामकाज पाहण्याची आणि आणखी काही विकासासंदर्भातील चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.

'माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील हल्लीचे तरुण अत्यंत कल्पक व चौफेर सारासार विचार करणारे आहेत. त्यांच्याकडे अनेक भन्नाट कल्पना असतात, पण सर्वांनाच सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. अशाच विखरलेल्या गुणवत्तेला 'मैं भी नायक... CM for a day' या स्पर्धेतून संधी देणार आहोत. विजेत्यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करता येणार आहे. अशा स्पर्धेतून भविष्यातील मुख्यमंत्री, मंत्री, राजकारणी निश्चितच निर्माण होतील, याबद्दल शंका नाही.'
- सत्यजीत तांबे, अध्यक्ष, महाराष्ट्र युवक काँग्रेस
  

loading image
go to top