
बुलढाणा : देशभरात 15 आगस्ट स्वातंत्र्यदिनी उत्साहाचे वातावरण असताना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात हक्काच्या मागणीसाठी एका आंदोलकाला जलसमाधी मिळाली. यात त्याचा मृत्यू झाल्याने नदी पात्रात प्रशासनाविरुद्ध मोठा राडा झाल्याची घटना समोर आली. परिस्थितीवर नियंत्रणासाठी दंगा काबू पथक आणि पोलिसांना पाचरण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत एन डी आर एफच्या पथकाने वाहून गेलेल्या आंदोलकाचा शोध घेतला.