तरुणांनो, तयारीला लागा! पोलिस भरतीसाठी २५ सप्टेंबरनंतर भरा अर्ज, आधी मैदानी मग लेखी परीक्षा; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 'मैदानी'चे नियोजन; १५,६३१ पदांची होईल भरती

राज्य सरकारने १५ हजार ६३१ पोलिस पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे. यातून सोलापूर शहर, ग्रामीण पोलिस, एसआरपीएफ क्र.१० व कारागृह विभागांतर्गत २२५ पदे भरली जाणार आहेत.
solapur
police bharatisakal news
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी राज्य सरकारने १५ हजार ६३१ पोलिस पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे. यातून सोलापूर शहर, ग्रामीण पोलिस, एसआरपीएफ क्र.१० व कारागृह विभागांतर्गत २२५ पदे भरली जाणार आहेत. २५ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणींच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळविण्याच्या तयारीकडे वळणार आहे.

सोलापूर शहर-जिल्ह्यात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे सात अॅकॅडमी आहेत. त्या माध्यमातून जवळपास दोन हजार विद्यार्थी पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. याशिवाय वैयक्तिक स्वरूपात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या देखील सात ते आठ हजारांपर्यंत आहे. पोलिस भरतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण- तरुणी दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज करतात तर अन्य जिल्ह्यातून अनेकजण सोलापुरात भरतीसाठी येतात.

पोलिस भरतीतील सोलापूरचा टक्का वाढला असून मागील दोन पोलिस भरतीत जिल्ह्यातील ७० हून अधिक जणांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांची संख्या विशेषत: ग्रामीण भागात वाढली आहे. यंदाच्या भरतीसाठी राज्यभरातून किमान १६ लाख तरूणांचे अर्ज येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे मैदानी चाचणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि लेखी परीक्षा साधारणत: जानेवारी- फेब्रुवारीत होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात भरली जाणारी पदे

  • सोलापूर शहर पोलिस ः ९९

  • ग्रामीण पोलिस ः ९२

  • एसआरपीएफ ः २९

  • कारागृह ः ०५

  • एकूण ः २२५

वयोमर्यादा संपलेल्यांना एक संधी, अन्‌...

आगामी पोलिस भरतीसाठी २०२२ व २०२३ या दोन वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे, त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भरतीच्या अर्जाचे शुल्क कमी करण्यात आले आहे. आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० रुपये आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपयांचे शुल्क अर्ज करताना भरावे लागणार आहे.

ठळक बाबी...

  • सुरवातीला उमेदवारांची होणार मैदानी चाचणी

  • मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक

  • लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवारांची होणार निवड

  • लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धीमत्ता चाचणी, सामान्यज्ञान व चालू घडामोडींवर असतात वस्तुनिष्ठ प्रश्न

  • मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी होईल लेखी परीक्षा; एका उमेदवारास एका पदासाठी एकाच जिल्ह्यात करता येईल अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com