

तात्या लांडगे
सोलापूर : राज्यात १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती होत असून, त्यात सोलापूर शहर पोलिस दलातील ७९ आणि ग्रामीण पोलिसांकडील ९५ पदे आहेत. पोलिस भरतीसाठी राज्यभरातून एका पदासाठी तब्बल १०६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये हे प्रमाण एका पदासाठी ५० उमेदवार असे आहे. सोलापूर शहरात एका पोलिस शिपाई पदासाठी ४३ तर बँड्समनच्या एका पदासाठी १६९ उमेदवार आहेत.
सोलापूरसह राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर सुरू होईल. महापालिकेनंतर ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारीत मैदानी चाचणी सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी मैदानी संपविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. उमेदवारांच्या अर्जांची संख्या राज्यात १६ लाख ७० हजारांपर्यंत असल्याने मैदानी चाचणीसाठी अंदाजे चार महिने लागतील.
मैदानी पार पडल्यावर पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. दरम्यान, सोलापूर शहरातील पोलिस शिपायांच्या ७३ पदांसाठी पुरुष उमेदवारांचे दोन हजार ४८८, महिला उमेदवारांचे ६२० आणि माजी सैनिक उमेदवारांचे २६ अर्ज आहेत. दुसरीकडे, बँड्समनच्या सहा पदांसाठी पुरुष उमेदवारांचे ७८५, महिला उमेदवारांचे २२७ आणि तृतीयपंथी उमेदवाराचा एक अर्ज असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली.
सोलापूर शहरातील स्थिती
पोलिस शिपाई भरती
७३
पोलिस बँड्समन
६
शिपाई पदासाठी अर्ज
३,१३४
बँड्समनसाठी अर्ज
१,०१७
फेब्रुवारीत होणार मैदानी चाचणी
फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी सुरू होईल. त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यभरात एकाचवेळी होणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून एका पदासाठी १० उमेदवारांची लेखी चाचणीसाठी निवड होईल. दरम्यान, ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले आहेत, त्याची पडताळणी सध्या सुरू आहे. एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांचा एकच अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.
शारीरिक चाचणीचे स्वरूप...
(पुरुष उमेदवार)
१६०० मीटर धावणे : २० गुण
१०० मीटर धावणे : १५ गुण
गोळाफेक (७.२६ किलो) : १५ गुण
एकूण गुण : ५०
---------------------------------------------
(महिला उमेदवार)
८०० मीटर धावणे : २० गुण
१०० मीटर धावणे : १५ गुण
गोळाफेक (४ किलो) : १५ गुण
एकूण गुण : ५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.