

Voting
ESakal
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा राखून निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याने २० जिल्हा परिषदा (ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि पंचायत समितीमध्ये ५० टक्क्यांच्या वर आरक्षण गेल्याने अहिल्यानगर, जालना, बीड या तीन जिल्हा परिषदा), तसेच ८८ पंचायत समित्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निकाल येईपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.