
Zilla Parishad and Nagar Parishad Elections
Sakal
थोडक्यात:
जिल्हा परिषद व नगरपरिषदांच्या निवडणुका यंदा दिवाळीनंतर भाऊबीजनंतर उमेदवारी अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या प्रभागरचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणूक तयारी सुरू आहे.
महापुरामुळे शेतकऱ्यांची नाराजी असून त्यावर मदत न झाल्यास पहिली निवडणूक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची होऊ शकते.
प्रमोद बोडके
Political Updates Maharashtra: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिला. चार महिन्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली, निवडणुकांसाठी आणखी चार महिन्यांची मुदत राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारने सर्वोच्चा न्यायालयाकडून घेतली.