ZP Election 2026, Maharashtra Zilla Parishad elections
esakal
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. मात्र, असलं तर राज्यात उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या निवडणुका आता दुसर्या टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका कधी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे.