शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी झेडपीने कंबर कसली! आता मुख्याध्यापक व शिक्षकांचीच भरणार शाळा; केंद्रप्रमुखांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांचीही कार्यशाळा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी शाळांच्या गुणवत्ता वाढीवर फोकस केला आहे. या पार्श्वभूमीवर डायटतर्फे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा तर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांची कार्यशाळा व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
solapur
solapur zp ceo manisha awhale sakal

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कमी पटसंख्येचा प्रश्न कायमचा निकाली निघावा, पटसंख्येअभावी कोणताही शिक्षक अतिरिक्त होवू नये, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी शाळांच्या गुणवत्ता वाढीवर फोकस केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेतर्फे (डायट) सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा तर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांची कार्यशाळा व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत दोन लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. मात्र, मराठी शाळांची गुणवत्तेत पिछाडी आणि पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल, यामुळे जिल्हा परिषदेच्या जवळपास सव्वाशे शाळांचा पट कमी झाला आहे. काही शाळांमध्ये विशेषत: सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत, पण तेथील पटसंख्या २० पेक्षा कमी आहे.

आता जिल्हा परिषदेच्या शाळांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या जवळपास १६५ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचेही नियोजन केले आहे. दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर आता केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा लागणार आहे. तसेच शिक्षकांनी शाळाअंतर्गत परीक्षांचे पेपर अचूक तपासणे आणि ते मुख्याध्यापकांनी पडताळणे जरूरी असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी देखील आता शाळांना भेटी देऊन गुणवत्तेचा आढावा घेणार आहेत.

सर्वकाही शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी...

  • शाळा सुरू झाल्यावर जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापकांची होणार एक दिवसीय सहविचार सभा

  • पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांना मिळणार गुणवत्ता वाढीचे प्रशिक्षण

  • दर महिन्यातून एकदा शिक्षकांची एक दिवसीय शिक्षण परिषद घेण्याचेही नियोजन

  • शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी होणार केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांची कार्यशाळा

  • नवनियुक्त शिक्षक शाळांवर रुजू झाल्यावर ‘डायट’कडून त्यांनाही दिले जाणार १२ दिवसांचे प्रशिक्षण

गुणवत्ता वाढीसाठी काटेकोर नियोजन

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांची कार्यशाळा, मुख्याध्यापकांची सहविचार सभा, शिक्षकांचे प्रशिक्षण असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, वेळापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com