esakal | झेडपीत लवकरच कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

State Government

झेडपीत लवकरच कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समित्यांमधील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या (Employee) सर्वसाधारण बदल्या (Transfer) केल्या जाणार आहेत. विभागनिहाय एकूण कर्मचाऱ्यांपैकी पंधरा टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार या बदल्या होणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक तालबद्ध कार्यक्रम निश्‍चित केला आहे. यानुसार येत्या गुरुवारपासून (ता. २२) ही बदली प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यामुळे अगदी कोरोनाच्या सावटात जिल्हा परिषदेत मात्र बदल्यांचा मोसम सुरू होणार आहे. (ZP will Soon have Staff Transfers)

राज्य सरकारने या बदल्यांसाठी ३१ जुलैची अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे या तारखेपुर्वीच पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे बंधन जिल्हा परिषदेवर आहे. या बंधनानुसार २२ ते २७ जुलै या पाच दिवसांत ही संपूर्ण बदली प्रक्रिया संपविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात 8,010 नवे रुग्ण, रिकव्हरी रेटही वाढला

या कालबद्ध कार्यक्रमानुसार २२ जुलैला छोटे पाटबंधारे विभाग (छोपावी), बांधकाम आणि अर्थ विभाग, २३ जुलैला शिक्षण, महिला व बालकल्याण आणि कृषी, २४ जुलैला आरोग्य, २६ जुलैला सामान्य प्रशासन विभाग आणि २७ जुलैला ग्रामपंचायत आणि पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

loading image